Breaking News

वासुंदे येथील बोकनकवाडीच्या तरुणाचा मृत्यू मागचे कारण अस्पष्ट घातपाताचा संशय !

वासुंदे येथील बोकनकवाडीच्या तरुणाचा मृत्यू मागचे कारण अस्पष्ट घातपाताचा संशय !
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील बोकनकवाडी येथील तरुण अजित रावसाहेब मदने हा २२ वर्षीय तरुण तालुक्यातील वडगावसावताळ - गादजीपुर च्या वन-विभागाच्या जंगलात  मृतावस्थेत आढळून आला वनविभागाच्या वाचमेनने सकाळी तेथे गेला असता त्याला हा मृतदेह दिसला त्यांनी गावांमध्ये याबाबत माहिती दिली. तसेच पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिस पथक त्या ठिकाणी दाखल झाले. 
मृतदेहाची पाहणी केली त्यानंतर पोलिसांनी तेथील परिसर पिंजून काढला मात्र आसपास कोणती निशाणी आढळून आली नाही श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके त्यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक राजेश गवळी प्रमोद वाघ व आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी चोकशी केली नंतर तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिविल हॉस्पिटल ला पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.
 
   वाळूच्या गाडीवर तरुण ड्रायव्हर होता मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी पार्टनरशिप मध्ये स्वतः गाडी घेतली असल्याची माहिती समोर येत असून मृतदेह ठिकाणी दुचाकी आढळून आली पोलीस पुढील तपास करत असून नेमकं कारण काय आहे याचा शोध सुरू आहे तरुणाच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याने घातपाताचा संशय बळावत आहे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच काही बाबी स्पष्ट होतील