Breaking News

संगमनेरात पुन्हा आढळले दहा कोरोना पॉझिटिव्ह !

संगमनेरात पुन्हा आढळले दहा कोरोना पॉझिटिव्ह
संगमनेर/प्रतिनिधी : 
संगमनेर तालुक्यात कोरोना संसर्ग काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन दिवसात जवळपास ९० रुग्ण कोरोना पॉझिटिव आले असताना आज (शुक्रवार दि.१७) रोजी दहा रुग्णांची भर पडून फक्त तीनच दिवसात कोरोनाची शंभरी पार झाली. आज संध्याकाळी शासकीय आणि खाजगी लॅब मधून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरासह तालुक्यात एकूण दहा कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यात तालुक्यातील निंभाळे, निमोण, हिवरगाव पावसा, कोल्हेवाडी, शिबलापूर येथील प्रत्येकी एक तर शहरातील मालदाड रोड, रेहमतनगर, श्रमिक नगर, गणेशनगर, शिवाजीनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३३२ इतकी झाली आहे.