Breaking News

संदीप पाटील वराळ यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर

निघोज/प्रतिनिधी 
    निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती स्व. संदीप पाटील वराळ यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. ५ जुलै रोजी निघोज येथील जैन स्थानक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून संदीप पाटील यांच्यावर प्रेम करणारे शेकडो युवक या रक्तदान शिबीरात भाग घेउन राष्ट्रीय कर्तव्याची पुर्ती करणार असल्याची माहिती संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे.
      गेली शंभर दिवसात लॉकडाउन काळात संदीप पाटील फौंडेशनने स्वस्त दरात घरपोहोच भाजीपाला उपक्रम, किराणा किट वाटप, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, लॉकडाऊनमुळे गोरगरीब गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी विवीध उपक्रम हाती घेत स्व. संदीप पाटील वराळ यांची सामाजीक स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. गेली चार वर्षातील प्रत्येक जयंती निमित्ताने सामाजीक उपक्रमांच्या माध्यमातून जयंतीदिनी अभिवादन करण्यात येते. आज मितीला कोरोना पार्श्वभूमीवर जनतेवर मोठे संकट आले आहे. अनेक सामाजिक संघटना लोकांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. आज रक्तदानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. यासाठी स्व. संदीप पाटील यांच्या जयंतीनिमित्त विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक या रक्तदान शिबीराला मदत करणार आहे. 
        संदीप पाटील यांच्यावर प्रेम करणारे शिरुर व पारनेर तालुक्यातील युवक या शिबिरात रक्तदान करुण सहभागी होणार आहेत. यावेळी कोनत्याही प्रकारची गर्दी न करता तसेच ठरावीक अंतर ठेउन डिस्टन्सिंगचे सर्व प्रशासकीय नियम पाळून कार्यकर्ते सहकार्य करणार आहेत अशी माहिती  संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील वराळ व पदाधिकारी आणि संदीप पाटील युवामंचचे पदाधिकारी तसेच निघोज ग्रामस्थांनी दिली आहे.