Breaking News

दुधाला योग्य भाव द्या अन्यथा दूध एल्गार आंदोलन अकोले भाजपचा इशारा !

दुधाला योग्य भाव द्या अन्यथा दूध एल्गार आंदोलन अकोले भाजपचा इशारा !

अकोले प्रतिनिधी :
दुधाला योग्य भाव मिळवा दुधाला व दुध भूकटीला अनुदान देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अकोले तालुका भाजपचे वतीने देण्यात आला.
        दूध दरवाढी साठी  आंदोलन हे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवराव पिचड  सिताराम पाटील गायकर, मधुकरराव नवले, जालिंदर वाकचौरे, शिवाजीराव धुमाळ, गिरजाजी जाधव, वसंतराव मनकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी दिलेले निवेदनात म्हटले आहे.
          तहसीलदार यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमालाला भाव मिळत नसताना दुधाचे भाव कमी झाल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पूर्वी दुधाचे भाव ३०-३५ रुपये प्रती लिटर होता आता हाच दर मागील तीन महिन्यांपासून २० रुपयांच्या आत आहे त्यामुळेच गायीच्या दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्या, प्रती लिटर दुधाला ३५ रुपये खरेदी दर द्या आणि दूध भुकटी करिता प्रती किलो ५० रूपये अनुदान द्या राज्य सरकारने  या मागण्याबद्दल तोडगा न काढल्यास १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे दुध एल्गार आदोलन करण्यात येईल.
      सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लिटर दुध खरेदी करून यापासून पावडर बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ मोजक्या सहकारी संघांना लागू करण्यात आला होता. राज्यात एकूण दूध संकलनापैकी ७८ टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी संघ व कंपन्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. परिणामी राज्यातील केवळ १२ तालुक्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा अंशतः लाभ मिळाला. अटी व शर्तीमुळे १०लाख लिटर पैकी प्रतिदिन केवळ निम्मेच दूध सरकार खरेदी करू शकले. सरकारच्या अशा अपुऱ्या व पक्षपाती हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. याच निर्णयामुळे तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला असल्याचा आरोप या वेळी आंदोलकांनी केला.
      भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती गोसावी यांनी स्वीकारले या वेळी भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, सुशांत वाकचौरे, बबलू धुमाळ, प्रवीण सहाणे आदी उपस्थित होते.
-------