Breaking News

माझ्या नावाचे बनावट ट्विटर अकाऊंट, हे विरोधकांचे षडयंत्र - सौ स्नेहलताताई कोल्हे.

माझ्या नावाचे बनावट ट्विटर अकाऊंट, हे विरोधकांचे षडयंत्र - सौ स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट तयार करून टिवट केल्याचे प्रकार हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र आहे, असे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.
माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट तयार केल्याचे माझ्या निदर्शनास आले असून त्याद्वारे मी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही. संबधित अकाऊंट हे बनावट असुन त्याबाबत मी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. या अकाऊंटवरून ट्विट आणि रिट्विट केल्याचे दिसत असल्याने केवळ मला बदनाम करण्याच्या हेतुनेच केलेले आहे.या बनावट अकाऊंट द्वारे नागरीकामध्ये माझ्या भुमिकेविषयी सभ्रम निर्माण केला गेला, ही खेदाची बाब आहे.खोटे नाटे आरोप करण्यासाठी सोशल मिडीयाचा यापुर्वीही सातत्याने वापर केला गेला, परंतु राजकारणाची पातळी सोडून अतिशय दर्जाहीन राजकारण केले जाते, ही  गोष्ट निश्चितच निषेधार्ह आहे.