Breaking News

केडगाव भागात भरदिवसा घरावर दरोडा; दरोडेखोरांची महिलेला मारहाण !

केडगाव भागात  भरदिवसा घरावर दरोडा; दरोडेखोरांची महिलेला मारहाण !
अहमदनगर/प्रतिनिधी :
अहमदनगर मधील केडगाव उपनगर भागातील भूषण नगर परिसरात जय हिंद कॉलनी परिसरात भरदिवसा दरोडा घालण्यात आला, दरोडेखोरांनी
जय हिंद कॉलनी मध्ये रहिवासी असलेल्या विमल खंडाळे यांच्या घरात तीन ते चार दरोडेखोर  घुसून त्यांना मारहाण केली मारहाणीत त्या बेशुद्ध झाल्या दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले तसेच देवघरातील देव व बेडरूम मध्ये कपाट तोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले सदर घटना ही आज दुपारी बाराच्या सुमारास घडली  घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक लोखंडे घटनास्थळी दाखल झाले