Breaking News

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन

मुबंई वृत्तसंस्था :
कोरोनामुळे अभिनेत्यासह, राजकीय नेते व सामान्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुरू असताना आता आणखीन एका बड्या व्यक्तीच कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनामुळे निधन झाले आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे.