Breaking News

राजगृहावरील हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा करा !राजगृहावरील हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा करा
करंजी/प्रतिनिधी :
  देशांवर कोरोना सारखी महाभयंकर महामारी असतांना महाराष्ट्र सारख्या पुरोगामी शाहू, फुले,आंबेडकराचा वारसा असणाऱ्या राज्यात दलितांवरील अत्याचाराचे पेव फुटले आहे.ही महाराष्ट्र राज्यासाठी खूप चिंताजनक बाब आहे. त्याच प्रमाणे ७/७/२०२० रोजी अज्ञात संजकटकांनी राजगृहावर हल्ला करत प्रचंड तोडफोड केली.
   राजगृह हे संपूर्ण जगातील आंबेडकरवादी जनतेची अस्मिता आहे.आजवर महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेवर खुप अन्याय झाले परंतु ते आह्मी सहन करत राहिलो पण आज आमच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला. तो आता देशातील आंबेडकरी समुदाय सहन करू शकणार नाही. त्या साठी मा मुख्यमंत्री व मा गृहमंत्री साहेब यांनी तातडीने लक्ष घालून आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशा आशयाचे मागणी पत्र  रिपब्लिकन ऑफ इंडिया (ए) गटाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार श्री योगेश चंदरे यांना देण्यात आले आहे.
यात त्यांनी सी बी आय चौकशी, राजगृहावर कायम स्वरूपी पोलीस संरक्षण पुरवावे तसेच आंबेडकर कुटूंबास झेड प्लस सुरक्षा पुरवावी आशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.  निवेदनात शहर अध्यक्ष देवराम पगारे, फारूक भाई बेग,मनोज डोखे, भाऊसहब भालेराव गणेश पगारे, बाळू आहेर,रवी बनकर, छोटू पाटोळे,संदीप वाहुळ आदींच्या सह्या आहेत.