Breaking News

कृषी विभागाचे गलथान नियोजन, अकोले तालुक्यात खतांची कृत्रिम टंचाई !

कृषी विभागाचे गलथान नियोजन, अकोले तालुक्यात खतांची कृत्रिम टंचाई !
अकोले/प्रतिनिधी :
यावर्षी  खरिपाच्या  हंगामात खतांची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे गेल्या महिना भरापासून तालुक्यात युरिया ची कृत्रिम टंचाई असतानाही कृषी विभाग या कडे दुर्लक्ष करत आहे.
      गतवर्षीप्रमाणे यावर्षीही खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांची तीव्र टंचाई  आहे तालुक्यातील शेतकरी या टंचाई त होरपळत आहे इतर तालुक्याच्या तुलनेत अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात टंचाई आहे.  टंचाईच्या आडू न कृषी सेवाकेंद्र चालक शेतकऱ्यांची लूटमार करत आहे  युरिया खत मिळविणे शेतकऱ्यांसाठी अवघड काम झले असून दुकानदाराच्या हातापाया  पडण्याची वेळ शेतकरी राजावर आली युरीया खत घेताना त्याला इतर खते घेण्या ची अट दुकानदार घालत आहे  इतर खते न घेतल्यास खत शिल्लक नाही आल्यान्नतेर देतो असे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे  कम्पनी दुकानंदार आणि  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साखळी पद्धतीच्या लुटमारीने  शेतकरी हैराण झाला आहे  शासन म्हणते बांधावर खते देणार  पण बांधावर नाही ,दुकानात नाही आणि गावातही नाही अशी परिस्थिती आहे शहरात कुठेतरी 4/6 दिवसांन 15/20 टन युरिया येतो, आणि शेकडो शेतकर्‍यांच्या रांगा लागतात. अशा वेळी प्रत्येक शेतकर्‍याला किमान एक-एक गोण देखील उपलब्ध होऊ शकत नसल्याने आणि खरीपाचा हंगाम पुढे सरत चालल्याने शेतकरी वर्गात शासन व राज्यकर्ते यांच्याबद्दल तीव्र नाराजी व संतापाची लाट निर्माण झाली आहे. 
     शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर खते देण्याची पोकळ घोषणा बाजी करण्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकांच्या देखरेखीखाली शेतकर्‍यांना खते उपलब्ध करून देण्यात यावीत. त्याचबरोबर खतांच्या गोण्या ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी हाताळतांना हुकाचा वापर केल्याने त्यातील खतांची मोठ्या प्रमाणात नासधुन होऊन शेतकर्‍यांच्या पदरात कमी माप पडते. ते त्या शेतकर्‍याचे वैयक्तिक नुकसान होत आहे. 
       खते-बियाणे तातडीने व योग्य दरात त्वरीत उपलब्ध व्हावीत, खत-बियाणे, औषधांचे बाजारभाव हजर स्टॉक इ. माहिती बाबतचे मोठ्या अक्षरातील फलक प्रत्येक खत विक्रेत्याच्या दुकानापुढे लावण्याचे आदेश व्हावेत, त्याचबरोबर दामदुपटीने होणारी विक्री व युरीया माफियांवर कारवाई व्हावी अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या असुन, येत्या आठवड्यात जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्राहक पंचायतने दिला आहे याबाबत  आज ग्राहक पंचायतीने तहसीलदार व कृषी अधिकाऱ्याना निवेदन दिले.
      यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका संघटक दत्ता शेणकर, सचिव दत्ता रत्नपारखी, प्रसिद्धी सचिव रमेश राक्षे, अ‍ॅड.दीपक शेटे, महेश नवले, अ‍ॅड.भाऊसाहेब वाळुंज, प्रा.डॉ.सुनिल शिंदे, माधव तिटमे, रामहरी तिकांडे, कैलास तळेकर, संजय वाकचौरे, सुरेश पवार, मच्छिंद्र चौधरी, दत्ता ताजणे, किरण चौधरी, राम भांगरे, ज्ञानेश्‍वर पुंडे, शुभम खर्डे, भाऊसाहेब गोर्डे, राजेंद्र घायवट, भाऊसाहेब वाकचौरे, भास्कर सदगिर, बाळासाहेब लोहोकरे, त्रिंबक बगनर, साळु कोंडार, शरद सदगीर, मेजर त्र्यंबक पडवळे, सुदाम मंडलिक, आदी उपस्थित होते.
-----