Breaking News

जामखेड पंचायत समिती सभापतीपदाचं त्रांगडं कायम ?

निवड प्रक्रिया झाली मात्र निवड जाहिर न करण्याचे न्यायालयाचे आदेश, तिढा कायम

" निवडीबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर पंचायत समिती कार्यालयाच्या आवराला अतिरिक्त पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डिवायएसपी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सपोनि आवतारसिंग चव्हाण, आरसीपी पोलिस दल यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनावश्यक फिरणारया अनेक वाहनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले "

जामखेड/प्रतिनिधी :
जामखेड पंचायत समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया झाली मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे निवड जाहीर करता आली नाही. संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधलेल्या   सभापतीपदाचे त्रांगडे  राजकीय खेळीमुळे कायम राहीले. 
 कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता जामखेड पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण बदलण्यात आले यावर माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेत सभापती पदाची निवड जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली. त्यामुळे सभापती पदाचे त्रांगडे कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 सध्या सभापती पदाचे आरक्षण 
 सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षणातून राष्ट्रवादीकडून राजश्री मोरे भाजपाकडुन मनिषा सुरवसे तर मागास प्रवर्गातून माजी सभापती भगवान मुरूमकर यांनी असे तीन अर्ज दाखल केले गेले आहेत. 
 निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत दि ३ जूलै रोजी सकाळी ११ वाजता कडेकोट बंदोबस्तात निवड प्रक्रिया पार पडली. 
आडीच वर्षे सभापती पदाची मूदत संपल्यानंतर पूढील कालावधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात १२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्य़ातील १४ पसचे सोडतीद्वारे आरक्षण घोषित झाले होते. त्यात जामखेडला अनुचित जमाती करिता आरक्षण सूटले होते मात्र या प्रवर्गाचा एकही सदस्य जामखेड पसला नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यावर ग्रामविकास खात्याचे मार्गदर्शन मागवत ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात चारही पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थित पून्हा आरक्षणाची सोडत काढण्यात आली नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या त्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघाले होते. 
 त्यानुसार जामखेड पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांच्या उपस्थितीत दि ७ जानेवारी रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली मात्र एकही अर्ज आला नसल्याने माळी यांनी निवडणूक प्रक्रिया दि ८ रोजी घेण्याचे घोषित केले परंतु त्या दिवशी फक्त राजश्री मोरेंचा सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला होता तर उपसभापती पदासाठी मनिषा सुरवसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या मूदतीत राजश्री मोरे यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे सभापती पद रिक्त राहिले आणि उपसभापती पदी मनिषा सुरवसे यांची निवड झाली. 
जामखेडचे सभापती पद रिक्त राहिले. त्यानंतर २७ जून रोजी जिल्हाधिकारी यांनी सर्वसाधारण महिलेचे आरक्षणानुसार जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया ३ जूलै रोजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता आरक्षण लागू केले याला आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल  केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत सभापतीपदाची निवड जाहीर न करण्याचे आदेश दिले होते.