Breaking News

संजीवनी पाॅलीटेक्निकचा निकाल १०० टक्के !

संजीवनी पाॅलीटेक्निकचा निकाल १०० टक्के
        (चतुर्थ सत्रात चार मुलींनी ९८-६७ टक्के गुण मिळवुन सिध्द केली   प्रतिभा संपन्नता )
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
 महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  परीक्षा मंडळ, मुंबईने अंतर्गत गुण मुल्यांकन व मागील सत्राच्या गुणांच्या आधारे द्वीतिय व चतुर्थ सत्रातील पाॅलीटेक्निक विध्यार्थ्यांचे  निकाल नुकतेच जाहीर केले असुन यात संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष  म्हणजे चतुर्थ सत्राच्या कॅाम्प्युटर टेक्नालाॅजी  विभागाच्या वैष्णवी  साहेबराव टेके, काजल सुनिल सोमवंशी , वैष्णवी शांताराम  नळे व वैष्णवी भिमाषंकर पवार यांनी ९८. ६७ टक्के इतके उच्चांकी गुण प्राप्त करून  प्रथम क्रमांक मिळविला आणि संजीवनी पाॅलीटेक्निकच्या शिरेपेचात  मानाचा तुरा खोवला आहे. १००  पेक्षा अधिक विध्यार्थ्यांना ९० टक्यां पेक्षा अधिक गुण मिळाले असुन याद्वारे संजीवनी पाॅलीटेक्निकने शैक्षणिक  गुणवत्तेमध्ये अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी  माहिती पाॅलीटेक्निकने प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिलेली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की चतुर्थ सत्रात सिव्हील इंजिनिअरींग विभागात वैभव नितीन शिंदे  याने ९८ टक्के गुण मिळवुन प्रथम, कांचन राजेंद्र अभंग हिने ९७ टक्के तर वैष्णवी  बाबासाहेब शिरसाठ  हिने ९५ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा गुणानुक्रमांक मिळविला. काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागात प्रज्वल बाबासाहेब काकडे याने ९८. ४० टक्के व अलिझा इर्फान सय्यद हीने ९८ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात साक्षी रामदास शेलार  हिने ९२. ६७ टक्के गुण मिळवुन प्रथम, संकेत बाहासाहेब कर्पे व राहुल धर्माजी चव्हाण यांनी अनुक्रमे ९२. ४० व ९१. ०७ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात यश  कालीदास बोरावके याने ९४. २५ टक्के गुण सर्व प्रथम, गौरव विकास जाधव याने ९४. १३ टक्के गुण मिळवुन दुसरा नंबर मिळविला तर पुजा चांगदेव काळे ही ९३. ६३ टक्के गुण मिळवुत तिसऱ्या  क्रमांकाची मानकरी ठरली. इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात कोमल अमृत चव्हाण हिने ९३. ४४ टक्के, आदित्य दत्तात्रय सोनवणे याने ९३  टक्के व नम्रता कमलाकर कसबे हिने ९२. ८९टक्के  गुण मिळवुन हे तिघेही अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या  व तिसऱ्या  क्रमांकाने उत्तिर्ण झाले. आय. टी. विभागात स्नेहल दादासाहेब होन हिने ९८. ५०  टक्के विक्रमी गुण मिळवुन पहिला नंबर पटकाविला तर पुजा संजीव जाधव व मानसी महेंद्र भाडके यांनी अनुक्रमे ९७. २५  व ९१. १३  टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
  द्वीतिय सत्रात सिव्हील इंजिनिअरींग विभागात संकेत कैलास नळे याने ९५. ०५ टक्के मिळुन प्रथम, सायली निलेश  सोनवणे हीने ९१. ७९ व अश्विनी  राजेंद्र सालके हिने ९०. ४२ टक्के  गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी विभागात सावरी बापुसाहेब जावळे हिने ९८. १३ टक्के असे विक्रमी गुण मिळवुन पहिल्या नंबरची मानकरी ठरली. दिप्ती शिवाजी  खोंड व वैष्णवी  चंद्रकांत चांदर यांनी अनुक्रमे ९७. ६३ व ९७. १३ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात अवांतिका सतिश  भोसले हिने ९१. १३ टक्के गुण मिळवुन वर्गात अव्वल येण्याचा मान मिळविला. समृध्दी कैलास गोर्डे हिने ८९. ७५ टक्के गुण मिळविले तर कल्याणी रामदास भवर हिने ८९. ३८ टक्के गुण मिळाले. या दोघींनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्ये संघ्या नानासाहेब म्हैस हिने ९५. २० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक, स्नेहल शिवाजी  वहाडणे व सुयश  सुनिल कर्जुले यांनी अनुक्रमे ९४. ४०  व ९४. २७ टक्के गुण मिळवुन दुसरा व तिसरा  क्रमांक मिळविला. मेकॅट्राॅनिक्स या अभियांत्रिकी शाखेत  प्रेम दिपक गायकवाड याने ९२. ५३ टक्के गुण मिळवुन वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाला. निकिता विठ्ठल गंडे हिने ९१. ३३ टक्के गुण मिळवुन दुसरा व साजिद सरदार पिंजारी याने ८९. ६० गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला.
       संजीवनी  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांचे या दैदिप्यमान यशाबध्दल अभिंनदन केले आहे