Breaking News

राहाता तालुक्यातील विविध विकासकामांच्या ई-निविदांची चौकशी करा!- प्रहार जनशक्ती संघटनेची मागणी

राहाता तालुक्यातील विविध विकासकामांच्या  ई-निविदांची चौकशी करा!
- प्रहार जनशक्ती संघटनेची मागणी

राहाता/ प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या विविध विकास कामाच्या झालेल्या ई-निविदाची चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांचेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे तसेच अंगणवाडी नविन इमारत बांधकाम कामाच्या ई-निविदा न होता बेकायदेशीर पणे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशा कामांची चौकशी करून कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी, राहाता यांना देण्यात आले आहे.
सदरील निवेदनात असे म्हटले आहे की, राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक, निमगाव कोऱ्हाले, बाभलेश्वर, पिंपरी निर्मळ, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, राजुरी,रुई, या तालुक्यातील काही मोजक्या गावातील कामाचे उदाहरना दाखल टेंडर आयडी देऊन चौकशी करावी चौकशी अंती असे निदर्शनास येईल की, तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर मनमानी पद्धतीने निविदा करून  जसे की ठेकेदारांनी भरलेल्या निविदा मधिल कागदपत्रे दिसत नाहीत असे बोगस कारणे देऊन ठेकेदार निविदा स्पर्धेतून बाहेर काढून टाकले जातात. तसेच इ-निविदा भरते वेळी लिफापा क्र.२ला उपअभियंता, राहाता यांचा स्थळ पाहणी अहवाल जोडणे आवश्यक आहे ह्या व अशा आशयाच्या जाचक अटी टाकुन टेंडर त्यांनी ठरविलेल्या तालुक्यातील मोजक्या ठेकेदारास देण्याचा घाट घातला जात आहे. तसेच अंगणवाडी नविन इमारत बांधकामाच्या ही इ-निविदा झालेल्या नाही.
सदर सर्व कामांच्या ई-निविदांच्या निःपक्षपाती चौकश्या करून झालेल्या खर्चाची रक्कम कायदेशीर मार्गाने वसुल करून घेऊन दोषी अधिकाऱ्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून निलंबित करावे. निवेदनात केलेल्या मागणी प्रमाणे कार्यवाही न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाअध्यक्ष अभिजित पोटे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक अभिजित कालेकर, तालुका अध्यक्ष दिनेशराजे शेळके,  तालुका उपाध्यक्ष दिपक घोगरे, लोणी शहर अध्यक्ष अनिल आहेर, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे इतर पदाधिकारी, अधिकारी, सदस्य, तसेच तालुक्यातील ठेकेदार हे पंचायत समिती राहाता येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असुन उपोषणाच्या दिवशी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यास निवेदनातील मागणी पूर्ण होई पावेतो गटविकास अधिकारी यांचे दालनात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती उद्धवजी ठाकरे , मुख्यमंत्री, हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, ओमप्रकाश (बच्चूभाऊ) कडु राज्यमंत्री, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद,अहमदनगर यांना देण्यात आल्या आहेत.