Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी !श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी.
श्रीगोंदा/प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांनी शंभरी गाठली असून एकूण रुग्ण संख्या १२२ एवढी वाढली असतानाच सोमवार दि. २७ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या कुटुंबापैकी ३० वर्षीय तरुणावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच शरीराकडून कोरोनाविरुद्ध उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.