Breaking News

कोपरगाव एच.पी.गॕस धारकांना डिजिटल पेमेंट व घरपोहच सिलेंडर डिलिव्हरी चे आवाहन !

कोपरगाव एच.पी.गॕस धारकांना डिजिटल पेमेंट व घरपोहच सिलेंडर डिलिव्हरी चे आवाहन !
कोपरगाव प्रतिनिधी :
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी व गॅस व्यवहारात अधिक पारदर्शकता येण्यासाठी कोपरगाव गॅस कंपनीच्या सर्व ग्राहकांना आता अगदी सहजरित्या गॅस सिलेंडरची डिलीव्हरी व डिजिटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
एच.पी. गॅस सिलेंडर बुकिंग ग्राहकांच्या रजिस्टर मोबाईल किंवा डिलीव्हरी प्रतिनिधींच्या एच.पी. वितरण अॕप वरून करता येईल.याशिवाय एच.पी. गॅस सिलेंडरचे पेमेंट करण्यासाठी आता अनेक डिजिटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत, जसे की,फोन पे,गुगल पे अशा अनेक पर्यायांद्वारे पेमेंट करता येणार आहे अशी माहिती कोपरगांव गॅस कंपनी व्यवस्थापकांकडून देण्यात आली .
    सर्व ग्राहकांनी ऑनलाईन सिलेंडर बुकिंग व डिजिटल पेमेंट सुविधांचा वापर करून घरपोच सिलेंडर डिलिव्हरी घ्यावी आणि कोपरगांव गॅस कंपनी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले .