Breaking News

पुण्यात २३ जुलैनंतर पुन्हा लॉकडाउन नाही

पुणे । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. सोमवारी लॉकडाउनचा सातवा दिवस आहे. यानंतर मात्र २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र या पुढील काळातदेखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे, असे नवलकिशोर राम यांनी म्हटले.