Breaking News

भातकुडगाव महाविद्यालयात कु.पुजा शंकर तुपे प्रथम !

भातकुडगाव महाविद्यालयात कु.पुजा शंकर तुपे प्रथम !
 घोटण/ प्रतिनिधी :
      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२० मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे भातकुडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची पुजा शंभर तुपे ८०% गुण मिळवून कला शाखेत महाविद्यालयात प्रथम आली.पुजा ही भातकुडगाव (ता.शेवगाव) येथील प्रगतशील शेतकरी शंकर तुपे यांची सुकन्या आहे. 
         पुजाने प्रथम क्रमांक मिळवत आईवडीलांना एक आगळा वेगळा आनंद दिला,प्राचार्य त्रिंबक जाधव सर,पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर शिंदे सर,सोसायटीचे चेअरमन पाराजी नजन,अजय नजन सर ,जगदीश उगले सर,कल्याण जगदाळे सर, आण्णासाहेब नागे सर,दत्तात्रय सुडके सर,शिवाजी तुपे,गोविंद जमधडे,शहादेव चितळकर,परसराम जमधडे,चांगदेव जमधडे,कचरु जमधडे,यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.