Breaking News

प्रवरानगर येथे गुटका जप्त !

प्रवरानगर येथे गुटका जप्त !
कोल्हार प्रतिनिधी : 
नगर येथील अन्न व भेसळ पथकाने गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर येथील व्यापारी पेठेत असणाऱ्या दोन किराणा दुकानांमध्ये अचानक धाड टाकून हजारो रुपयांचा गुटका जप्त करून दुकाने सील केली असल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.                                 याबाबत मिळालेली माहिती अशी की राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील व्यापारी पेठेमध्ये किराणा दुकाने असून या पैकी दोन किराणा दुकानांमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर येथील अन्न व भेसळ प्रशासनाच्या पथकाने अचानक दोन दुकानांवर धाड टाकून या दोन दुकानांमधील हजारो रुपयांचा गुटका जप्त करून या दुकानांना सील केले आहे यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रवरा परिसरातील अनेक किराणा व अन्य दुकानांमध्ये खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याची चर्चा सुरू होती याविषयीची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली होती परंतु या गोष्टीवर कोणतीही कारवाई होताना दिसत नव्हती त्यामुळे नागरिक नाराज झाले होते.
   त्यातच गुरुवारी नगर येथील अन्न भेसळ विभागाने कारवाई केल्यामुळे एका किराणा दुकानातून अंदाजे 44 हजार 500 रुपयांचा माल तर दुसऱ्या एका दुकानातून 18 हजार 500 रुपयांचा गुटका जप्त केला असल्याचे अन्न व भेसळ विभागाच्या नगर येथील पथकाने सांगितले असून या कारवाई केलेल्या दुकाना  सील करण्यात आल्या आहे.
   गेल्या अनेक दिवसापासून या परिसरातील किराणा दुकाने, छोटे-मोठे व्यवसाय करणारे तसेच पानटपरीधारक हे खुलेआम गुटका विक्री करताना दिसतात परंतु अशा विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नव्हती पण गुरुवारी अचानक नगर येथील अन्न व भेसळ प्रशासनाने कारवाई केल्यामुळे या परिसरातील दुकानदारामध्ये खळबळ उडाली आहे.