Breaking News

कोतुळ येथे सापडला पुन्हा करोना पॉझिटिव्ह !

कोतुळ येथे सापडला पुन्हा करोना पॉझिटिव्ह !
अकोले/ प्रतिनिधी
   अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आज पुम्हां एक करोना  पॉझिटिव्ह रुग्ण  आढळला आहे यापूर्वी कोतुळ येथे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते त्यांनी करोना वर मात केली आहे आता पुन्हा गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने  स्थानिक प्रशासनाने खबर दारीच्या  उपाय योजना सुरू केल्या आहे 
अकोले तालुक्यात आज दिवसभरात चार  कोरोना बाधित आढळल्याने  तालुक्याची रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर गेली  आहे.
अकोले तालुक्यात आज मंगळवारी सायंकाळी अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवालात तालुक्यातील ०३ जणांचा तर खाजगी लॅब मधील एक अशा चार जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे यात तालुक्यातील जांभळे येथील ६१ वर्षीय महीला, बदगी बेलापुर येथील ४७ वर्षीय पुरूष तर  कोतुळ येथील ५१ वर्षीय पुरूषाचा  व  खाजगीतील औरंगपूर  येथील २२ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. 
  तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या  ९६ झाली आहे त्यापैकी ६६ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर २७ जणांवर उपचार सुरु आहे.
--