Breaking News

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गिडेगाव मधील तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गिडेगाव मधील तरुणावर  विनयभंगाचा गुन्हा दाखल !

नेवासा/तालुका प्रतिनिधी :
 तालुक्यातील गिडेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अनिकेत किशोर साळुंखे या तरुणा विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिडेगाव येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दि.17 जुलै रोजी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, ती गिडेगाव येथे वडील,आई व लहाण बहीण असे एकत्र राहवयास असुन आई वडील मोलमजुरी
करुन परिवाराचो उपजिविका भागवतात. आमचे गावातच अनिकेत किशोर साळुंखे हा त्याच्या आई वडीलांसह राहवयास  तो शाळेत माझ्या पुढे एक वर्षे आहे. मी आत्ता 12
वीची परिक्षा दिली असुन सध्या सुट्या असलेने मशीन काम शिकत आहे.
 सुमारे एक वर्षे पुवी मी शाळेतुन घरी येत असतांना आमचे गावातील अनिकेत साळुंखे हा मला रस्त्यात भेटला व मला म्हणाला कि- " तु मला खुप आवडतेस मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे ".त्यावर मी त्यास नकार दिला. त्यावेळी तो मला म्हणाला कि " माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तु जर नाही  म्हणालीस तर त्याचे परिणाम खुप वाईट होतील.” त्यांनतर तो अधून मधुन मी शाळेत जात असतांना तसेच घरी येत असतांना माझा पाठलाग करुन मला प्रपोज मारत असे. परंतु सदर प्रकारामुळे मी घाबरुन
 गेले मुळे घरी कोणालाही काही एक सांगितले नव्हते.

आत्ता सुमारे 15 दिवसापूर्वी दुपारी 12.00 वा सुमारास ( तारीख वार आठवत नाही ) मी मशिन क्लास करीता सुनिल काकासाहेब साळुंखे यांच्या वस्तीवर जात असतांना वाटेत मला अनिकेत किशोर साळुंखे हा भेटला व मला म्हणाला कि " माझे तुझ्यावर प्रेम असुन मला तुझ्या सोबत लग्न कराचे आहे.
तु मला नकार का देतेस. तु जर नकार दिला तर त्याचे परिणाम खुप वाईट होतील.” तो असे म्हणाले वर मी त्याला म्हणाले कि " मी तुला यापूर्वी ही सांगितले आहे कि माझे तुझ्यावर प्रेम नाही आणी मला तुझ्या सोबत लग्न करायचे नाही .” असे त्यास समजावुन सांगितलेचा त्यास राग आलेने त्याने माझा हाता धरुन
 मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तो तेथुन निघुन गेला. मी घाबरलेली असलेने सदर प्रकारा बाबत कुणालाही काही एक सांगितले नव्हते. परंतु त्याचा भविष्यात मला पुन्हा त्रास होवु नये याकरीता
घडलेली घटना माझे आई वडीलांना सांगितली व त्यांच्या सोबत फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले
आहे.या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अनिकेत किशोर साळुंखे रा.गिडेगाव,ता.नेवासा यांचे विरुद्ध गुन्हा रजी नंबर 409/2020 भादवी कलम 354-ड,तसेच  लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 07,08 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(आय)(डब्ल्यू)(आय),3(2)(व्ही-ए) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे हे करत आहेत.