Breaking News

नगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण.

नगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात उद्या बदल. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला दोन वर्ष पूर्ण.
 नेवासा तालुका प्रतिनिधी : 
    मराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी
जलसमाधी घेतली या घटनेला गुरुवारी दोन वर्ष पूर्ण होत आहे.त्या अनुषंगाने उद्या मराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
आंदोलनात मोठ्याप्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याची शक्यता असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण,शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय अहमदनगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घेतला आहे.
गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गवरील वाहतूक वळविण्यात आली आहे.सदरील आदेश शासकीय वाहने अंबुलन्स व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.

अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्ग ! 

(अहमदनगर-नेवासाफाटा-कुकाणा-शेवंगाव-पैठण-बिडकीन-मार्गे औरंगाबाद.) 
(अहमदनगर-घोडेगाव - कुकाना - शेवंगाव -पैठण -बिडकीन- मार्गे औरंगाबाद) 

औरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्ग ! 

(औरंगाबाद- बिडकीन- पैठण- शेवगाव- मिरी- पांढरीपुलमार्गे- अहमदनगर)