Breaking News

कोपरगावात ३१ जुलै रोजी टाळेबंदी !

कोपरगावात ३१ जुलै रोजी टाळेबंदी !
करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातील व  शहरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते कि, कोपरगाव शहरा सह तालुक्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव साखळी खंडित करणेकामी नागरिक व सर्व व्यापारी संघ यांच्या मागणी नुसार प्रशासनाच्या वतीने  आठवड्यातील प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) असतो. परंतु या आठवड्यातील दिनांक १ ऑगस्ट २०२० शनिवार रोजी बकरीईद हा सण असल्यामुळे या आठवड्याचा जनता कर्फ्यू शनिवार ऐवजी दिनांक ३१ जुलै २०२० वार शुक्रवार रोजी राहील.
याची सर्व व्यावसायिक व नागरिकांनी नोंद घ्यावी. अशी माहिती कोपरगावचे तहसीलदार श्री योगेश चंद्रे, नगरपालिका मुख्यधिकारी श्री प्रशांत सरोदे, शहर पोलिस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर यांनी दिली आहे प्रशासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे असे ही आव्हान करण्यात आले आहे.