Breaking News

वनकुटे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण !

पारनेर प्रतिनिधी :
     पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून दि ५ जुलै रोजी अपहरण केले असल्याची फिर्याद मुलीच्या आईने पारनेर पोलीस स्टेशन ला दिली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वनकुटे येथील अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञाताने दि ५ जुलै रोजी तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून फिर्यादीच्या परवानगीशिवाय पळून नेले असल्याची फिर्याद मुलीच्या आईने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे त्यानुसार भादवि कलम  ३६३ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
   पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहेत.