Breaking News

अकोलेच्या राजूर, धुमाळवाडी व भंडारदरा परिसरातील पेंडशेत येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह.

अकोलेच्या राजूर, धुमाळवाडी व भंडारदरा परिसरातील पेंडशेत येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह. 
 
  राजूर/प्रतिनिधी :
        अकोलेच्या राजूर मध्ये एक महिला कोरोना पॉजिटीव्ह व  धुमाळवाडीत एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे सदर तरुण मुबई येथून आलेले होता अकोलेच्या व पश्चिम पट्ट्यातील पेंडशेंत गावातील महिला कोरोना पॉझिटीव्ह. निघाली आहे.
    अकोले तालुक्यात ठिकठिकाणी कोव्हिडचे रुग्ण सापडत असतानाच अकोल्यात पश्चिम पट्ट्यातील कळसुबाई शिखराचा व भंडारादरा धरणाचे पाणलोट क्षेत्र मात्र अबाधित होते. पंरतु शेवटी पेंडशेंत गावातील हा तरुण मुंबईला जाऊन कोव्हीड पॉझिटीव्ह झाला आहे.सदर तरुण आठ दिवसांपुर्वी मुंबईतुन पेंडशेंत या आपल्या मुळ गावी आला होता.काही कारणामुळे चार ते पाच दिवसांपूर्वी तो परत मुंबईला गेला.तेथे गेल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असता. त्याचे स्वॅब तपासले असता तो कोव्हीड पॉझिटीव्ह निघाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. 
     असे असता आज पेंडशेत येथील महिला पॉझीटीव्ह निघाल्याचे समजले आहे. सदर महिला ही त्या तरुणाच्या यांच्या संपर्कात आल्याचे समजते. तो तरुण हा मुंबई वरून या महिलेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता.शेवटी ग्रामीण भागात देखील  कोरोनाचे रुग्ण सापडला आहे. पेंडशेत गावात कोरोनाचा आता शिरकाव झाला आहे.