Breaking News

चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !

चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित चासनळी येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२०  मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेट वर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१ पाडेकर वेदांत संजय एकूण टक्के - ७३.५०%
२ गाढे जयेश अनिल एकूण टक्के - ७३.००%
३ भवर कृष्णा नवनाथ एकूण टक्के - ७२.०० %
 
१२ वी वाणिज्य  शाखेचा निकाल ९४ % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१ कु. पवार पायल राजेंद्र एकूण टक्के -  ७५.२३%
२ कु. सानप निकिता वसंत एकूण टक्के -  ७४.७६ %
३ मोहिते ईश्वर वसंतराव एकूण टक्के -  ७४.१५%
 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव रोहमारे, उपाध्यक्ष मा. श्री. रामदास पा. होन, सचिव मा. श्री. ऍड. संजीव कुलकर्णी, श्री. चंद्रशेखर कुलकर्णी श्री. संदीप रोहमारे, श्री. सुजित रोहमारे  संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नारायण बारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.