Breaking News

सत्यशोधक डॉ अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन !

सत्यशोधक डॉ अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने सत्यशोधक डॉ अण्णा भाऊ साठे पुण्य तिथी निमित्ताने अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा शहर अध्यक्ष  सुजल चंदनशिव म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या लेखणी व शाहिरीतून सर्व सामान्य कष्टकरी, शेतकरी व कामगारांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम केले असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णा भाऊ साठे यांचे अतुलनीय योगदान आहे मात्र आजही शासन अण्णा भाऊ साठे यांच्या योगदान कडे दुर्लक्ष करत असून वाटेगाव ते रशिया हा अण्णा भाऊ साठे यांचा जीवन प्रवास जनतेला प्रेरणा देणारा असून सोलापूर विद्यापीठाने अण्णा भाऊ साठे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला असून भारत सरकारने या वर्षी अण्णा भाऊ साठे यांच्या सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्ताने भारत रत्न पुरस्कार देऊन गौरव करावा.
या प्रसंगी उपस्थितांना करोना साथीच्या आजारामुळे मास्क व सॅनिटाझर देऊन व सामाजिक अंतर ठेवून अभिवादन करण्यात आले.
या वेळी सुजल चंदनशिव , किशन भालेराव, करण मरसाले, शैलेश आहीरे, गोविद साठे,प्रसाद मरसाले,आदित्य आहीरे आदी युवा कार्यकर्ते हजर होते.