Breaking News

साईनाथ विद्यालयात मुलींनी मारली बाजी !

साईनाथ विद्यालयात मुलींनी मारली बाजी 
पारनेर प्रतिनिधी-
 पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील साईनाथ हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 96 टक्के लागला आहे दहावी मध्ये प्रथम आलेल्या चारही विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा समावेश आहे त्यामुळे साईनाथ विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये मुलींनी बाजी मारली आहे यामध्ये विद्यालयात तील कु.पोखरकर आकांक्षा कैलास प्रथम 93% कु.कवडे सिद्धी संतोष द्वितीय 92.6% कु.रासकर मानसी कैलास तृतीय 92 .4 कु.जाधव पूर्वा संजय चतुर्थ 92% कु.कवडे चैत्राली ज्ञानेश्वर चतुर्थ 92% या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्यांना विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये प्राचार्य मंगेश जाधव,भरत पाचारणे, डी.बी.काळे,मंगेश कारखिले,पी. डी.पवार ,जी.बी. शिंदे धोंडगे सर,करंदीकर यांनी विशेष प्रयत्न केले विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सरपंच बाबाजी भंडारी व सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब पुंडे रयत संस्था मॅनेजिंग कौसिंल सदस्य शंकरराव माने तसेच आळकुटी ग्रामस्थांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.