Breaking News

पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथील ग्रामसेवकाला कोरोनाची बाधा.

पारनेर पंचायत समिती पुढील आदेश येईपर्यंत बंद - तहसीलदार ज्योती देवरे
प्रतिनिधी/पारनेर
   पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथील ग्रामसेवक कोरोना बाधित आढळून आलेला आहे. त्यामुळे पंचायत समिती व परिसरातील शंभर मीटर भाग हा ४८ तासा पर्यंत बंद करण्यात आला आहे. तसेच संपर्कातील माहिती मिळे पर्यंत पारनेर शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे.
पंचायत समिती मध्ये संबंधित ग्रामसेवक काही दिवसांपूर्वी येऊन गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना काही संशय असतील त्यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी केले असून
पारनेर तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कान्हूर पठार पाठोपाठ ढवळपुरी येथील ठेकेदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यात कोरोना बाधित संख्या वाढत आहे तसेच आज एका ग्रामसेवकाला कोरोना ची बाधा झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हा ग्रामसेवक कोणाच्या संपर्कात आला आहे त्याबाबत आता प्रशासनाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.