Breaking News

क्वारंटाईन केलेल्या त्या महिलेने आत्महत्येची धमकी दिली.


क्वारंटाईन केलेल्या त्या महिलेने आत्महत्येची धमकी दिली.

देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
                      राहुरी तालुक्यातील एका दुध संघातील राजकीय पदाधिकारी कोरोनो बाधीत निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले.राहुरी कारखाना येथील एकाच कुटुंबातील  तींघांना क्वारंटाईन केल्यानंतर या कुटुंबातील 38 वर्षीय महिलेने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील क्वारंटाईन कक्ष अक्षरशःहा डोक्यावर घेतला. राहुरी तहसिलदार ,तालुका वैद्यकिय अधिकारी,देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी , मुख्याधिकारी वाटेल तशा भाषेत बोलून आम्हाला घरी नेऊन सोडा  आम्हाला काही होणार नाही. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा स्ञाव तपासणीचा आल्या शिवाय सोडता येत असे सांगितले असता सदर  महिलेने मी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहुन ठेवून आत्महत्या करीन आशी धमकी दिल्याने प्रशासनाने तीच्यासह कुटुंबाला रुग्णवाहीनीतून घरी सोडण्यास सांगितले रुग्णवाहीनी दारात पोहचली या तिघांचा अहवाल कोरोना बाधीत आला.त्यावेळी माञ सदर महिलेने नरमाईने घेत आम्हाला उपचारासाठी परत न्या रुग्णवाहीनेच्या चालकाने स्पष्ट इनकार दिला. वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी त्यांना उपचारासाठी पुन्हा पाठवले. घडलेल्या घटनेस  डा.मासाळ यांनी दुजोरा   दिला. 
                  याबाबतसविस्तरमाहिती अशी की,राहुरी तालुक्यातील एका दुध संघातील राजकीय नेत्यासह त्यांचे कुटुंब कोरोना बाधीत  निघाल्यानंतर  त्यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या मध्ये राहुरी कारखाना येथील एका  कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश होता. त्या राजकीय पदाधीकाऱ्याचा वाहन चालक असल्याने त्या नेत्याशी या वाहन चालकाचा जादा संपर्क असल्याने त्यास दि.12 जुलै  रोजी कृषी विद्यापीठात  क्वारंटाईन करण्यात आले. दि. 13 जुलै पासुन या कुटुंबातील 38 वर्षीय महिलेने राहुरी तहसिलदार एफ.आर.शेख, तालुका वैद्यकिय अधिकारी नलिनी विखे, देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ, मुख्याधिकारी अजित निकत यांच्या समोर गोंधळ घालत आपत्ती व्यवस्थापन कामात अडथळा आणला.  वाटेल तशा भाषेत बोलून आम्हाला घरी नेऊन सोडा  आम्हाला काही होणार नाही. आम्ही आमची जबाबदारी घेण्यास समर्थ आहोत.  परंतू तहसिलदार सह इतर अधिकाऱ्यांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.त्या महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांने  त्या महिलेच्या गोंधळाचे चिञिकरण करुन घेतले. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा घशातील स्ञाव तपासणीचा अहवाल येत नाही तो पर्यंत सोडता येत नाही.असे सांगितले असता नाही त्या महिलेने गोंधळ घातला. 
               दि.14  जुलै रोजी सायंकाळी इतर भागातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी आणले असता या महिलेने गेट बंद करुन घेतले. आम्हाला घरी नेऊन घाला तर गेट उघडले जाईल नाही तर क्वारंटाईन करण्यासाठी आणलेल्या व्यक्तींना आत येवू दिले जाणार नाही.अशी भुमिका घेतल्याने प्रशासनाची मोठी अडचन निर्माण झाली. याबाबतची तहसिलदार एफ.आर. शेख यांना देण्यात आली.राञीची वेळ आहे. उद्या सकाळी तुम्हाला घरी सोडण्यात येईल असे तहसिलदार यांच्या वतीने सांगण्यात आले. परंतू त्या पुर्वी तुम्हाला लेखी लिहुण द्यावे लागेल की होणाऱ्या परीनामास व आजारा बाबत होणाऱ्या परीणामास आम्ही जबाबदार राहू असे त्या कुटुंबाच्या वतीने त्या महिलेने लेखी दिले. त्या नुसार दि 16  रोजी सकाळी 11  वाजता या कुटुंबास  108 क्रमांकाच्या रुग्णवाहीनेतुन घरी सोडण्यात आले. रुग्णवाहीनी  त्या कुटुंबाच्या दारात पोहचली त्या वेळी कुटुंबाचा अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालात हे कुटुंब कोरोना बाधीत असल्याचे नमुद करण्यात आले होते. 
                    रुग्णवाहीनीच्या चालकाच्या भ्रमणभाषवर आरोग्य विभागाने संपर्क साधुन ते कुटुंब बाधीत असल्याचे सांगितले.त्या कुटुंबाला तसा निरोप देण्यास सांगितले. रुग्णवाहीनी चालकाने तसा निरोप देताच त्या कुटुंबातील महिलेने आम्हाला उपचारासाठी परत घेवून जा अशी विनवनी केली. परंतू  रुग्णवाहीनी चालकाने स्पष्ट शब्दात इन्कार दिला. मला तुम्हाला घरी सोडण्यास सांगितले होते.तुम्हाला घरी सोडले माझे काम झाले. तुम्ही आता खाजगी रुग्णालयात उपचार घ्या असे म्हणुन रुग्णवाहीनी चालक रुग्णवाहीनी घेवून निघाला असता त्या कुटुंबाने डाँ.मासाळ  यांच्याशी संपर्क साधुन रुग्णवाहीनी चालकास आम्हाला उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगा अशी विनंती ते कुटुंब करु लागले. डाँ.मासाळ यांनी रुग्णवाहीनी चालकास भ्रमणभाष वरुन संपर्क साधुन त्या कुटुंबास उपचारासाठी घेवून जा असे सांगितले . त्यानंतर रुग्णवाहीनी चालकाने त्या कुटुंबाला उपचारासाठी घेवून गेला.

    "त्या महिलेवर कारवाई होणार की नाही?" 
              क्वारंटाईन असलेल्या महिलेने घरी जाण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या विलगिकरण कक्षात महसुल व आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या समोर गोंधळ घातला. गोंधळ घालताना खालच्या भाषाचा वापर केला.याचे महसुल विभागाने चिञिकरण केले.सक्षम पुरावा असल्याने "त्या महिलेवर कारवाई होणार की नाही?" याबाबत  राहुरीचे तहसिलदार  एफ.आर.शेख  काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.