Breaking News

अबब ! एका दिवसात ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह, संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच..

अबब !! एका दिवसात ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह, संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच.. 
संगमनेर/प्रतिनिधी:
संगमनेर शहरासह तालुक्यात आज (बुधवार दि.१५) दिवसभरात एक दोन नव्हे तर तब्बल ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधितांची वाढ होण्याची हि पहिलीच वेळ आहे. कोरोना बाधित असलेल्यांपैकी २१ रुग्ण तालुक्यातील कसारा दुमाला, तळेगाव दिघे, माहुली, निमोण, वडगावपान, साकुर आणि गुंजाळवाडी गावातील असून उर्वरित रुग्ण हे संगमनेर शहरातील आहेत. त्यामुळे आज आलेला कोरोना बाधितांचा आकडा नागरिकांच्या मनात धडकी भरवणारा ठरला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या २६६ वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत तालुक्यात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे..