Breaking News

नागरिक, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांनी कोपरगाव पाच दिवसाचे उत्स्फूर्त लॉकडाऊन करणे गरजेचे- कोपरगाव काँग्रेस कमिटी

नागरिक, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांनी कोपरगाव पाच दिवसाचे उत्स्फूर्त लॉकडाऊन करणे गरजेचे- कोपरगाव काँग्रेस कमिटी
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     कोपरगावात अनलॉकनंतर गेल्या दोन अडीच महिन्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आता कोपरगाव हद्दी अंतर्गत येत असलेल्या शहर आणि ग्रामीण परिसरात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीच या भागात ५ दिवस उत्सुर्तपणे लॉकडाऊन करने गरजेचे आहे.श्रेयाचे व मुद्दा लाटण्याचे राजकारण कोपरगाव साठी नवीन नाही परंतु आता ही वेळ राजकारण करण्याची नाही उत्स्फूर्त बंद या मुद्दाचे राजकारण न करता सर्वांनी कोपरगावकरांची एकजूट दाखवून कोरोना महामारीला पुन्हा एकदा तालुक्यातून हद्दपार करून दाखवल्यास भविष्यातील संकट दुर होईल असे जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव खांबेकर यांनी नमूद केले,
या उत्स्फूर्त बंद मध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात यावी.कोपरगाव वरील संकट रोखण्यासाठी या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली जावी, स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करणारे कोपरगाव जिल्ह्यातील पहिला तालुका आदर्शवत ठरेल. 
 कोपरगाव परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून गेल्या आठवडाभरापासून तर यामध्ये आणखी भर पडली आहे. रुग्णावढीचा वेग देखील वाढला असून दररोज १० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. रविवारी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात उचंकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे असल्याने  नागरिकांमध्ये चिंतेचे वातारण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोपरगाव काँग्रेस ची बैठक झाली असून जिल्हा काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोकराव खांबेकर,जिल्हा युवक काँग्रेस चे तुषार पोटे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,सचिव लक्ष्मण फुलकर,अल्पसंख्यांक सेल जिल्हा सचिव राजुभाई पठाण,तालुका सचिव विष्णू पाडेकर,विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष निरंजन कुडेकर,दादा आवारे व इत्यादी सोशल डिस्टनसिंग पाळून उपस्थित होते.
    या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा,मेडिकल,हॉस्पिटल्स,रुग्णवाहिका तसेच दूध व्यवसाय (सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत )वगळून सर्व व्यवसाय पाच दिवस बंद ठेवल्यास रुग्णवाढीला आळा बसेल असे सूचित करण्यात आले असून स्थानिक पातळीवर आमदार महोदय,तहसीलदार,जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री महोदय यांच्याशी विनंती चर्चा करून पुढील कार्यवाही ठरवू असे तुषार पोटे यांनी सांगितले,सदर मागणीसाठी स्थानिक छोटे व्यापारी,मजूर,कामगार व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याचेही ते म्हणाले,१५-२० दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील उत्स्फूर्त बंद स्थानिक व्यापार्यांमध्ये राजकारण केले गेल्याने यशस्वी झाला नाही, तेथील परिस्थिती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे तरी सदर मुद्द्याचे राजकारण न करण्याचे सर्व पक्षांना,व्यापारी बांधवाना नम्र विनंतीचे आवाहन केले,आपले कोपरगाव आपल्या हातात असे शेवटी  सर्व जण एकजुटीने म्हणाले