Breaking News

अवैध मरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने चिमुरड्याचा जिव घेतला. वडील गंभीर जखमी

अवैध मरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने चिमुरड्याचा जिव घेतला. वडील गंभीर जखमी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी  
                 राहुरी तालुक्यातील कणगर येथे मुरूम वाहणाऱ्या ढंपर खाली सापडून शनिवारी  दुपारी १२ वाजता ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या चिमुकल्याचे वडील गंभीर जखमी झाले. 
                     याबाबत सविस्तर माहिती अशी की, कनगर येथील बबन साईराम    उऱ्हे वय वर्ष -३२ हे शनिवारी  सकाळी आपला आठ वर्षाचा मुलगा कार्तिक यास कनगर गावातून उंबरदरा भागात असलेल्या आपल्या घरी मोटारसायकलवर  जात असतांना समोरून कार भागातून मुरूम भरून आलेल्या ढंपरने  जोराची धडक दिली.
                   या अपघातात आठ वर्षीय कार्तिक उऱ्हे  हा जागीच ठार झाला आहे.कार्तिक हा ढंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे.तर त्याचे वडील बबन उऱ्हे हे  गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे.
              घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे पोलीस फौजफाट्या सह घटनास्थळी दाखल झाले.यावेळी  संतप्त जमावाला पांगवून चिमुरड्या 
कार्तिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान ढंपर चालक अपघात ठिकाणाहून पसार झाला असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आपघातातील डंपरचा क्रमांकवर पिवळसर कलर मारलेला आहे. 
                   राहुरी तालुक्यात सर्वत्र अवैध मुरूम उत्खनन सुरू असून याकडे महसूल विभाग कानाडोळा करत आहे.लक्ष्मीचा आशिर्वाद असल्याने महसुल विभाग दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी कनगर ग्रामस्थांनी केली आहे.