Breaking News

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील तिघे जिल्ह्यातून तडीपार!

     अकोले तालुक्यातील कोतुळ येथील तिघे जिल्ह्यातून तडीपार!
अकोले/प्रतिनिधी :
पोलिसांच्या रडारवर असणारी कोतुळ (ता अकोले )येथील  एका टोळी च्या मोहरक्याना  जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी  दीड वर्षासाठी चार  जिल्ह्यातून हद्दपार  केले आहे राजूर ,कोतुळ च्या मोट्या कारवाई नंतर आता पोलिसांचे लक्ष वाळू तस्करांकडे  आहे.
 कोतुळ येथील  तिघांचा  या कारवाईत सामावेश असून मोहन सखाराम खरात (वय 26), गुलाब भिकाजी खरात (38), अमोल भिकाजी खरात (वय 33) तिघे रा. कोतुळ यांना नगर ,नाशिक,  , पुणे ,ठाणे  अशा चार जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
 अकोले तालुक्यातील  गुन्हेगारी जगताला  हा  पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे.
    कोतुळ परिसरात  संघटीत गुन्हेगारी निर्माण करुन दहशत माजविणे, लोकांना मारहाण करणे, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, मारामारी करुन दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, दगडफेक करून दुखापत  करणे, अशा गंभीर गुन्ह्याचा ठपका असलेल्या  कोतुळ येथील एका टोळीचे मोहरके असणाऱ्या तिघांना   पोलिसांनी चार जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
राजूर च्या  शुक्ला टोळी नंतर आता कोतुळची खरात टोळी चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. राजूर व शेंडी येथील आणखी काही ना हद्दपारिसाठी पोलीस प्रयत्नात आहे     अकोले तालुक्याचे  अवैध दारू धंद्यातून गुन्हेगारी वाढत आहे   त्याच बरोबर अवैध वाळू तस्करी तूनही मोठी गुन्हे घरी फोपावत।असल्याने आता काही  वाळू तस्करही तडीपार  करण्याचे तयारीत पोलीस प्रशासन असल्याचे समजते 
    अकोले तालुक्यातील कोतुळ येथील मोहन सखाराम खरात व गुलाब भिकाजी खरात यांना  दिड वर्षासाठी तर अमोल भिकाजी खरात यास एक वर्षासाठी नगर जिल्ह्यासह नाशिक, सिन्नर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर अशा चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 
     कोतुळ ची कारवाई अकोले चे पोलीस निरीक्षक अरविंद  जोंधळे यांच्या पाठपुराव्याने झालीं आहे दरम्यान कोतुळ येथील तडीपारीची  कारवाई ही राजकीय सूड भावनेतून केली असल्याची चर्चा सुरू आहे या  कारवाईतील एक जण हा कोतुळ च्या विद्यमान महिला उपसरपंच सविता खरात यांचा पती आहे   गावच्या राजकारणात पतीचा हस्तक्षेप वाढला होता   उपसरपंच निवडीनंतर पहिल्या टर्म साठी निवड झाली होती मात्र दुसऱ्या  टर्म साठीज्या सदस्याला  शब्द दिला होता त्यासाठी  उपसरपंच  सविता खरात राजीनामा देत नसल्या मुळे  त्याच्या कुटुंबा वर सूड भावनेतून  ही कारवाई केल्याचे बोलले जाते   घरगूती भावकीच्या भांडणातून त्याच्यावर  दोन केसेस होत्या मात्र त्याला राजकीय वळण देऊन कारवाई केल्याचे बोलले जात आहे