Breaking News

निघोज येथे नियमाचे पालन न करणाऱ्यांवर तहसिलदारांची धडक कारवाई.

निघोज/प्रतिनिधी : 
      करोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना पारनेर तालुक्यातील निघोज येथे करोनाच्या पाश्वभुमीवर लागु केलेल्या शासकीय नियमाचे पालन न करणार्या एका होलसेल किराणा दुकानासह बेजाबदार पणे वावर करणार्यांवर आज पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी धडक कारवाई केली. तहसिलदारांच्या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
   पारनेर तालुक्यात करोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असताना निघोजमध्ये अनेकजण शासकीय नियमाचे पालन करीत नव्हते. आज सायंकाळी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने शासकीय नियमाचे उल्लघन करणार्या अनेक व्यवसायिकांना व भाजी विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला. तसेच शासकिय नियमाचे पालन न करणार्या येथील. कोहीनूर किराणा दुकान तहसिलदांरानी सिल केले तर दुचाकी वाहन चालवणार्यांनाही चोप दिला. मास्क न वापरणार्यांनाही उठाबश्या काढायला लावल्या. निघोज बसस्थानकावर बसणार्या भाजी विक्रेत्यांनाही हटविले.यापुढे बसस्थानकावर भाजी विक्री करण्यास मज्जाव केला.
     तसेच बसस्थानकावरील अतिक्रमणे पडली असताना या ठिकाणी सुरु असलेली दुकाने तातडीने बंद करुन ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेशही त्यानी यावेळी ग्रामपंचायतीला दिले. यावेळी सरपंच ठकाराम लंके, कामगार तलाठी विनायक निंबाळकर या करवाईत सहभागी झाले. तहसिलदांराच्या या धडक कारवाईचे ग्रामस्थानी स्वागत केले आहे.