Breaking News

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा -- पोलिस निरीक्षक कटके

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा -- पोलिस निरीक्षक कटके
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोरोनावर अद्याप उपचार निघलेला नाही.कोरोना साथ दिवसेंदिवस  जोरात सुरु आहे.बचाव हाच त्यापासून वाचण्याचा उपाय आहे  सार्वजनिक गणेशोत्सव हा सर्वांचा आहे.मात्र काळ प्रतिकूल आहे.याचे सर्वांना भान ठेवावे लागणार आहे.त्यातच आपले सर्वांचे हित असुन कोपरगाव  तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी व नागरिकांनी गणेशोत्सव साध्या पध्दतीने शक्यतो घरातल्या  घरात साजरा करावा असे आवाहन  कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकअनिल कटके यांनी  केले आहे
आगामी गणेशोत्सवानिमित्त कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण  कोपरगाव तालुक्यातील चार - पाच गावांमिळुन सुरक्षित  अंतर पाळत मिटींगचे आयोजन करण्यात येते त्याअनुशंगानेच  खिर्डी गणेश ,येसगाव , ब्राम्हणगाव,नाटेगाव आदी गावातील  तरुण मंडळ,डी.जे.मालक यांची येसगाव येथील साई लॉन्स येथे  सोशल डीस्टंसिंग ठेऊन   गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक  आयोजित केली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने,शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुराग येवले, खिर्डी गणेश सोसायटीचे चेअरमन  चंद्रभान रोहोम,सोपान चांदर,  नाटेगावचे उपसरपंच जयवंत मोरे येसगावचे  उपसरपंच  दिनेश कोल्हे,  सिताराम पाईक,  बिट हवालदार आंधळे,  ग्रामविकास अधिकारी रफीक सय्यद,   पोलीस पाटील रवींद्र बनकर,माजी पोलिस पाटील बाबासाहेब वराडे,सोमनाथ डफाळ सह  ,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी पुढे बोलताना पोलिस निरीक्षक अनिल कटके म्हणाले की तालुक्यातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक  सुचनांचे काटेकोर पालन करुन हा धार्मिक उत्सव साधेपणानेच साजरा करावा उपस्थितांचे  आभार अनुराग येवले यांनी मानले