Breaking News

कोपरगाव मध्ये कोरोनाचा कहर !

कोपरगाव मध्ये कोरोनाचा कहर !
करंजी प्रतिनिधी - 
   आज रविवार संध्याकाळी कोपरगाव शहरातील काले मळा व गांधीनगर भागात ३ कोरोना बाधित आढळुन आले होते त्यांचा संपर्कातील २१  लोकांना प्रशासनाने केअर सेन्टर मध्ये ताब्यात घेत त्यांची रॅपिड टेस्ट केली असता परत ४ रुग्ण बाधित आढळुन आले तसेच कोपरगाव निवारा परिसरातील ४ असे आज केवळ ३ तासात ११ रुग्ण शहरात सापडल्याने कोपरगाव पसिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
      कोपरगाव शहरातील मध्यवस्ती असलेल्या काले मळा परिसरातील  संध्याकाळी सापडलेल्या बाप लेकाच्या संपर्कातील अनुक्रमे २४,२९ व ५९ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आल्या आहे तर गांधी नगर भागातील रुग्णाच्या संपर्कातील समता नगर मधील ५० वर्षीय पुरुष असे ऐकून ४ अहवाल आता ९.४५ मिन च्या रॅपिड टेस्ट नुसार  पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. तसेच आता १० वाजता च्या खाजगी लॅब च्या रिपोर्ट नुसार निवारा भागातील एका कुटुंबातील अनुक्रमे ४०,१४ व ९ असे पुरुष व एक महिला ३८ असे ४ अहवाल प्राप्त कोरोना बाधित आढळून आल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आज अवघ्या ३ तासात ११ रुग्ण कोपरगाव शहरात सापडले असल्याने  बाधित रुग्ण राहत असलेला परिसर सील केलेला असून त्यांचा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.