Breaking News

जे. टी. एस. विद्यालयाचा निकाल ७९ टक्के; कु. राजेश्वरी आंबेकर विद्यालयात प्रथम !

जे. टी. एस. विद्यालयाचा निकाल ७९ टक्के; कु. राजेश्वरी आंबेकर विद्यालयात  प्रथम !
बेलापुर/प्रतिनिधी :
 बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या जे. टी. एस. माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा शेकडा निकाल ७९.०१ टक्के लागला असुन कु.राजेश्वरी अजय आंबेकर ही विद्यार्थिनी ९४.०० टक्के गुण मिळवुन  विद्यालयात सर्वप्रथम आली आहे.
*कु.श्रुतिका रविंद्र कर्पे व कु.साक्षी विलास दळवी या ८८.८० टक्के गुण मिळवुन द्वितीय तर कु. हर्षिता राकेश खैरनार ही ८८.४० टक्के गुण मिळवुन विद्यालयात तृतीय आली आहे.*
*या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव अँड. शरद सोमाणी, खजिनदार हरिनारायण खटोड,सहसचिव दीपक सिकची, विद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष बापुसाहेब पुजारी, ज्युनिअर कॉलेजचे  अध्यक्ष राजेंद्रप्रसाद खटोड, सिनियर कॉलेजचे अध्यक्ष राजेश खटोड ,प्रतिनिधी संचालक माजी सरपंच भरत साळुंके,एम. सी. व्ही. सी. च्या अध्यक्षा श्रीमती लिलाबाई डावरे, एस. आर. के. प्राथमिक विघालयाचे अध्यक्ष व उपसरपंच रविंद्र खटोड,तसेच शेखर डावरे ,शिक्षक प्रतिनिधी अनिल तायडे,मुख्याध्यापिका जयश्री उंडे यांच्यासह शिक्षक-सेवकवृंदाने यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे कौतुक केले आहे.*