Breaking News

मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार, राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस !

मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार, राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
पुणे/प्रतिनिधी
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्या मॉन्सून ओदिशा, बिहार, तेलंगणा, हरियाना यांच्याबरोबर मराठवाडा आणि विदर्भात सक्रिय आहे. त्यामुळे कोकणासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी, तसेच विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसांत राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.