Breaking News

पारनेर मध्ये बाजरी बियाणे'न उगल्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी दाखल केला कंपनीवर गुन्हा !

पारनेर पोलीस स्टेशन मध्ये कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बाजरीचे बियाणे न उगवल्याने दैनिक लोकमंथन ने उठवला शेतकऱ्यांसाठी आवाज 
शिवसेना उपतालुका प्रमुख ताराचंद गाजरे यांनी केला पाठपुरावा व पारनेर परिवर्तन फाउंडेशनच्या लढायला यश..! 
 
 पारनेर/प्रतिनिधी - 
       पारनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या यावर्षी पेरणी केलेल्या बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केले होते त्यानुसार राहुरी विद्यापीठाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली त्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांना याबाबत निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये बाजरी बियाणे कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे यावर्षी बाजरी बियाणे उगवले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या तसेच दैनिक लोकमंथन ने याविषयी बातम्या प्रसिद्ध केले व त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाचे पाहणी पथकाने तालुक्यांमध्ये येऊन पाहणी केली त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना याबाबत निष्कर्ष देण्यात आला त्यानुसार कृषी अधिकारी यांनी दि ७ रोजी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये म्हटले आहे की तालुकास्तरीय तक्रार निवरण समितीमध्ये अध्यक्ष असलेले वाळीबा उघडे यांना नियुक्त केलेले आहे खरीप हंगाम २०२० मध्ये पारनेर तालुक्यामध्ये शेतकरी सखाराम सोमा गायकवाड राहणार देवीभोयरे राजू भालचंद्र गाजरे राहणार देवरे वाल्मिकी महादू कारखिले राहणार राळेगण थेरपाळ पांडुरंग लक्ष्मण कारखिले राहणार राळेगण थेरपाळ ता पारनेर यांच्या पी एच आय सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीच्या बाजरी बियाण्यांच्या उगवणी बाबत तक्रारी तालुकास्तरावर प्राप्त झाले होते त्यानुसार कायदा १९८३ च्या वनवे तरतुदीस अधीन राहून बियाणे निरीक्षक म्हणून सदर तक्रारीचे अवलोकन केले असता पी एच आय सीड्स लिमिटेड हैदराबाद या कंपनीने बाजरी या पिकाची अत्यंत निकृष्ट दर्जाचे बियाणे उत्पादित करून त्यांच्या विक्रेत्या त्यामार्फत शेतकऱ्यांना पुरवल्याने तसेच बियाणांच्या पाकिटावर उगवणक्षमता ७५ टक्के नमूद केली असताना प्रत्यक्षात अत्यंत कमी प्रमाणात उगवण झालेली दिसून आली आहे त्यामुळे आम्ही बियाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते शासकीय बियाणे चाचणी प्रयोगशाळा पुणे येथे पाठवले असून सदर कंपनीने निकृष्ट बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे सिद्ध होत आहे त्यामुळे पी एस आय सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद ही कंपनी व श्री मालोजी सदाशिव कदम वय ३३ कंपनी प्रतिनिधी राहणार गोतंडी ता इंदापूर जि पुणे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचे उत्पादन प्रक्रिया व विपणन केले आहे तरी पी एच आय सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने खरीप हंगाम २०२० मध्ये बाजरी या पिकाची अत्यंत निकृष्ट दर्जाचे यांच्या विक्रेत्या मार्फत शेतकऱ्यांना पुरवली तसेच बियाण्यांच्या पाकिटावर उगवणक्षमता ७५ टक्के नमूद केली असताना कमी झाल्याने त्यांच्याविरोधात भादवि १९६६ च्या कलम ४२० ३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर व पंचायत समिती कृषी अधिकारी वाळीबा उघडे यांनी फिर्याद दिली  त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोत्रे करत आहे.


....