Breaking News

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रबोधन चळवळीचे -- पंडित भारूड

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रबोधन चळवळीचे -- पंडित भारूड
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 "साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रबोधन चळवळीचे असल्याचे मत पंडित भारूड यांनी व्यक्त केले . संवत्सर येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालयाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथि निमित्ताने अभिवादन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी क्रांतिवीर लहुजी सेना टायगर संघटनेचे
प्रदेश अध्यक्ष विजय काकडे , दीपक कांबळे ,बाळासाहेब कांबळे ,साई थोरात आदि मान्यवर अभिवादनासाठी  उपस्थित होते.   साठेंच्या प्रत्येक
साहित्यामधून अन्याया विरूद्ध बंड करणारे नेतृत्व  चळवळ करते आहे .साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शताब्धी वर्षानिमित्त त्यांना भारत रत्न हा किताब  दयावा ,त्यांच्या संपूर्ण साहित्यांचे पुनर्मुद्रण करून
महाविद्यालय ,शाळा ,वाचनालय यामध्ये मोफत प्रचारार्थ ठेवावे ,महामंडळाचा संपूर्ण समाज सक्षमीकरणासाठी वापरावा ,त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्र्रात जेथे  शाहिर अण्णाभाऊ साठेच्या  समरकाचे काम अपुरे असेल ते पूर्ण करण्याचे आवाहन शासनास व संघटनानां  भारुड यांनी केले