Breaking News

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सेवा देणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय : ॲड.सुरेंद्र खर्डे पाटील

कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या सर्वाचा आपल्याला अभिमान आहे : ॲड.सुरेंद्र खर्डे पाटील
कोल्हार/प्रतिनिधी : 
 कोरोनाच्या महामारीपासून बचाव करण्यासाठी कोल्हार व भगवतीपुर च्या नागरिकांनी मास्क वापरणे सोशल डिस्टन्स ठेवणे ,सॅनिटायझर चा वापर करावा तसेच सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच ॲड.सुरेंद्र खर्डे पाटील यांनी केले.

कोल्हार येथील नगर अर्बन मल्टीपल निधी व कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी ,सफाई कर्मचारी ,पाणीपुरवठा कर्मचारी ,कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर ग्रामपंचायतचे कर्मचारी ,पोलीस,आशा सेविका व पत्रकार यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ॲड.सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी ,कोल्हार बुद्रुकच्या सरपंच सौ.रीना अनिल खर्डे ,कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे ,भगवतीपुरचे सरपंच रावसाहेब खर्डे ,उपसरपंच अशोक दातीर ,नगर अर्बन मल्टीपल निधी चे चेअरमन अनिल गरदरे ,व्हा चेअरमन अनिता मुसमाडे ,व्यवस्थापक नितीन विधाते ,नोडल अधिकारी डॉ.राहुल कुंकूलोळ, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय घोलप ,कोल्हार बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे ,भगवतीपुरचे ग्रामविकास अधिकारी एस. जी. कोते आदी यावेळी उपस्थित होते.