Breaking News

आकांक्षा बाबासाहेब घोगरे हिचे बारावी परीक्षेत उत्तम यश !

आकांक्षा बाबासाहेब घोगरे हिचे बारावी परीक्षेत उत्तम यश !
नगर/प्रतिनिधी :
जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव ने संचलित काकासाहेब म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागापूर या विद्यालयाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 92.85% लागला असून विद्यालयातील विज्ञान शाखेतील आकांक्षा घोगरे हिने माहिती तंत्रज्ञान व गणित या विषयात शंभर पैकी 94 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावत तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिक्षक तसेच संस्थाध्यक्ष मा. आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील, मा . आ. चंद्रशेखर घुले पाटील, जि. प. अध्यक्ष सौ राजश्रीताई घुले पाटील, पंचायत समिती सभापती श्री क्षितिजा (भैय्या) घुले पाटील, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन सर, विद्यालयाच्या प्राचार्य शितल बांगर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा धामणे यांनी विशेष कौतुक केले. तिच्या या यशाचे खरे श्रेय ती आपल्या आई चंद्रकला घोगरे व वडील बाबासाहेब घोगरे यांना देती. विशेष मार्गदर्शन वर्ग शिक्षक काटे सर यांनी केले.