Breaking News

पाथर्डी तालुक्यात दिवसभरात रॅपिड चाचणी मध्ये आढळले २५ कोरोनाबाधित रुग्ण; शहरात १७ तर ग्रामीण भागात ८ जण बाधित !पाथर्डी तालुक्यात दिवसभरात रॅपिड चाचणी मध्ये आढळले २५ कोरोनाबाधित रुग्ण; शहरात १७ तर ग्रामीण भागात ८ जण बाधित !
पाथर्डी/प्रतिनिधी :
    शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय येथे ८० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.त्यामध्ये २५ रुग्ण कोरोनाबाधित निघाले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली.
     पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर, नाथनगर,खंडोबा नगर, हरिजन वस्ती (कसबा),मौलाना आझाद चौक,खाटीक गल्ली,भंडार गल्ली,हंडाळवाडी तर तालुक्यातील तिनखडी,चिंचपूर इजदे,निपाणी जळगाव या गावातील कोरोना रुग्ण आहेत.यामध्ये शहरातील १७,निपाणी जळगाव २,तिनखडी ५ ,चिंचपूर इजदे १ असे एकूण २५ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.
      तर तालुक्याचा आकडा १२८  वर पोहचला असुन,पुणे येथील रुग्णांवर पाथर्डी येथे उपचार सुरू असल्याने तालुक्याची रुग्ण संख्या १३१ झाली आहे.तर शहराची रुग्णसंख्या ७९ वर पोहचली आहे.