Breaking News

श्रीगोंदा तालुक्याचे ग्रहण संपेना तालुक्यात कोरोनाची केले अर्धशतक पूर्ण !

श्रीगोंदा तालुक्याचे ग्रहण संपेना तालुक्यात कोरोनाची केले अर्धशतक पूर्ण !
श्रीगोंदा/प्रतिनिधी : 
कोळगाव येथे पुन्हा तीन तर लोणी व्यंकनाथला दोघे पॉझिटीव्ह, काही बड्या नेत्यांशी संपर्क आल्याची माहिती 
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाचे ग्रहण काही केल्या संपत नसून वाढतच आहे. आत्ताच आलेल्या अहवालात तालुक्यात पाच नवे कोरोना रुग्ण सापडल्याने एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 50 झाली आहे. कोरोनाचे तालुक्यात जणू अर्धशतकच पुर्ण केले आहे. कोळगाव येथील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर लोणीव्यंकनाथ येथे दोघे  पॉझिटिव्ह सापडले आहेत. दरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील काहिंचा संपर्क तर  तालुक्यातील महत्वाच्या नेत्यांच्या संपर्कात आल्याने प्रशासन कामाला लागले आहे. तरी नागरिकांनी स्वतः च स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .