Breaking News

अनधिकृतपणे टाकलेले पाल हटवण्याची नगरसेवक प्रसाद आव्हाड यांची ई-मेलद्वारे मागणी

पाथर्डी प्रतिनिधी : 
शहरातील भगवान नगरच्या पाठीमागे धामणगाव रस्त्यावर डोंगरी लोकांनी अनधिकृतपणे पाल टाकून बसले असुन त्यांना हटवण्यात यावे यासाठी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी ईमेलद्वारे पाथर्डी पोलीस ठाणे,नगरपालिका, तहसिल कार्यालय याने निवेदन दिले आहे.
     त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भगवाननगरच्या पाठीमागे धामणगाव रस्त्यावर डोंगरी लोक पाल लावून राहत आहेत.त्यांची भांडणे,शिवीगाळ आदी बाबीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या लोकांच्या संख्येत रोज भर पडत आहे.तरी आपण जाणीवपूर्वक लक्ष्य घालुन हे लोक आणि त्यांचे पाल हटवावेत ही लगतच्या रहिवाशांच्या वतीने आपणास निवेदन देत आहे.