Breaking News

राष्ट्रवादी कोपरगाव कडून उपराष्ट्रपती यांना पत्र !

राष्ट्रवादी कोपरगाव कडून उपराष्ट्रपती यांना पत्र
  करंजी प्रतिनिधी-
राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी जय शिवाजी या घोषणेवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतल्याबद्दल कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा आज जाहिर निषेध करण्यात आला.
   कोपरगावचे आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून जय भवानी जय शिवाजी लिहुन २००० पत्र पाठवण्याचे ठरवले असून आज प्रातिनिधिक स्वरूपात पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवले आहेत. 
       याधीही महाराष्ट्र राज्यात महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी शपथ घेताना महापुरुषांची, कुलदैवत तर कोणी मातापित्यांना स्मरुण शपथ घेतली होती. त्यावेळीही फडणवीस यांनी सदर युगपुरुषांच्या नावांवर आक्षेप घेऊन शपथविधी घटनाबाह्य असून तो रद्द करण्याची मागणी केली होती. आणि आता व्यंकय्या नायडु यांनी केलेली कृती हीसुद्धा शिवद्रोहच आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कदाचित मोरारजी देसाई यांच्या प्रमाणे महाराष्ट्र द्वेष करण्याचा वारसा चालवायचा आहे का? असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,  कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे, उपाध्यक्ष बाला गंगूले, आनंद जगताप, संतोष दळवी, शिवा लकारे, युसूफ शेख, शफीक शेख, हृषीकेश खैरनार, आकाश डागा, महेश उदावंत, गौतम खंडिझोड यांसह पदाधिकारी उपस्थित होते.