Breaking News

भाजपच्या आमदार मोनिका राजळे १४ दिवस होम क्वारंटाईन !


भाजपच्या आमदार मोनिका राजळे १४ दिवस होम क्वारंटाईन 
पाथर्डी/प्रतिनिधी :
पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने शनिवार पासून होम क्वारंटाईन
होत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.असून त्यांच्या कार्यालयामार्फत माध्यमाना माहिती देण्यात आली आहे.
        याबाबत सविस्तर माहिती अशी की,पाथर्डी शेवगावच्या  आमदार मोनिका राजळे या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने शनिवार त्यांचा अहमदनगर येथील जिल्हारुग्णालयात घशाचा स्रावाचा नमुना घेऊन कोरोना टेस्ट घेण्यात आली.तेव्हापासून त्या होमक्वारंटाईन झाल्या  आहेत.दरम्यान शनिवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजता त्यांचा रिपोर्ट आला असुन त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची कोरोनाची बाधा झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.परंतु त्यांना १४ दिवस  होमक्वारंटाईन राहण्याबाबत  सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आमदार मोनिका राजळे  स्वतःच्या घरीच क्वारंटाईन झाल्या आहेत.