Breaking News

पढेगाव ग्रामपंचायत मनमानी कारभाराची चौकशी करा, भानुदास शिंदेंची कोपरगाव गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !

पढेगाव ग्रामपंचायत मनमानी कारभाराची चौकशी करा, भानुदास शिंदेंची कोपरगाव गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !
 कोपरगाव प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या पढेगाव ग्रामापंचायतचा मनमानी कारभार सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने सुरु ठेवला असुन,लाखो रुपयांची कामे सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरु आहे,संपूर्ण कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याची तक्रार गौतम बँकेचे माजी संचालक भानुदास शिंदे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. 
      ग्रामंचायतीने पारदर्शक कारभाराला हरताळ फासत ग्रामसदस्य तथा ग्रामस्थांना  विश्वासात घेतले जात नसुन ग्रामपंचायतीचा  कारभार पुर्णपणे ग्रामसेवक ,सरपंचांचा मनमानी पद्धतीने सुरु असुन,पढेगांव ग्रामपंचायत हद्दित नसलेला करंजी पढेगाव शिवरस्ता जो सरपंच निवासस्थानाकडे जाणाऱ्या  रस्त्याचे कामासाठी  गावातील इतर निधिचा वापर केलेला असुन,सदर काम अवैध केले असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्यास संपुर्ण टेंडर रक्कम संबंधितांकडून  वसुल करण्यात यावी.आजपर्यंत झालेल्या कामांचे गुणवत्ता  मुल्यमापन व्हावे तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या  बैठक न घेता इतिवृत्त लिहले जाते,केवळ सरपंचांच्या  लाभासाठी शिवरस्त्याचे काम गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने इतर रस्त्यांचा निधी वळवून केले आहे. याबरोबरच गावातील सर्व  रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी . या आशयाचे निवेदन गटविकास आधिकारी,सभापती,पंचायत समिती सदस्यांना देण्यात आलेले आहे असुन अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याने पंचायत समिती प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भानुदास शिंदे यांनी केला आहे.

करंजी पढेगाव शिवरस्त्याचे काम १४व्या वित्त आयोगातून मंजुर केलेले असुन रितसर कामाची  टेंडर नोटीस वृत्तपत्रात छापुन टेंडर दिलेले आहे.कुठेही अनियमितता झालेली नसुन बिनबुडाचे आरोप आहे.
------
प्रकाश शिंदे सरपंच,ग्रामपंचायत पढेगाव ता.कोपरगाव

पढेगाव ग्रामपंचायतचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असुन त्यासाठी चौकशी अधिकारी दत्तात्रय रानमाळ यांचेकडे दिलेला आहे.त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे विलंब झाला तरी दोन तिन दिवसांत चौकशी करण्यास येतील.
----------
   दिलीप सोनकुसळे ,गटविकास अधिकारी पं.समिती कोपरगाव