Breaking News

सीमेवरील तणाव चीनमुळेच!

- भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन/वृत्तसंस्था
पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाईट हाऊसने या मुद्द्यावरून कठोर प्रतिक्रियाही व्यक्त केली. शिवाय, सध्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चीनलाच जबाबदर धरण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर म्हटलेकी, भारत-चीन सीमेवर चीनची आक्रमक भूमिका ही जगातील अन्य भागातील चीनच्या आक्रमकतेच्या पॅटर्नशी सुसंगत आहे. अशा कृतीमधून चिनी कम्युनिस्ट पार्टीचा खरा स्वभाव दिसून येतो. भारत-चीन सीमावादाच्या विषयावर व्हाईट हाऊसची आतापर्यंत थोडी सौम्य भूमिका होती. पण प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला फटकारल्याचे वॉशिंग्टनमधील भारत-अमेरिका संबंधांच्या अभ्यासकांनी सांगितले. भारताने चीनवर डिजिटल स्ट्राइक करून 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या बंदीला अमेरिकेने संपूर्ण पाठिंबा दिला. या बंदीमुळे भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्‍या या अ‍ॅपवर भारताने घातलेल्या बंदीचे आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचे रक्षण होईल, असे त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले.