Breaking News

नेवाशात वादळी वाऱ्यासह 'वरुण राजा' बरसला, लखलखणारे विजेसह ढगांच्या गडगडासह मोठा पाऊस!

नेवाशात वादळी वाऱ्यासह 'वरुण राजा' बरसला ! तालूक्यात समाधान ! लखलखणारे विजेसह  ढगांच्या गडगडासह मोठा पाऊस!
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यात गुरुवारी राञी साडेदहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह 'वरुन राजा'ने हजेरी लावली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
  गुरुवारी दिवसभर उकाड्याने घामाघूम केलेल्या निसर्गाने गुरुवारी राञी जोरदार हजेरी लावली.वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने महाविज वितरण कंपणीलाही विद्यूत पुरवठा खंडीत करावा लागला यंदाच्या झालेल्या पाऊसामध्ये हा मोठा पाऊस असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
   राञी साडेदहा वाजता सुरु झालेला पाऊस १०:४५ पर्यंत जोरदार सुरुच होता पंधरा मिनिटाच्या कालावधीमध्येही चौहीकडे पाणीच पाणी झाले होते. कित्येक वर्षातून असा पाऊस नेवासा तालुकाकरांना अनुभवास  मिळालाआहे