Breaking News

विद्यापीठाचा रक्षकच निघाला भक्षक !

विद्यापीठाचा रक्षकच निघाला भक्षक !
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी :
             महात्मा फुले कृषि विद्यापीठात कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. राहुल नवनाथ देसले यांच्यावर जीव घेणा हल्ला झाल्याबाबत सुरक्षा विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले होते. परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये विद्यापीठाचे सहायक सुरक्षा अधिकाऱ्यांने शास्त्रज्ञाला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
                शास्त्रज्ञ डॉ. राहुले देसले यांच्यावर विना क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या चार जणांनी हल्ला केला होता. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. विद्यापीठाचा सुरक्षा विभाग तसेच पोलिस प्रशासनापुढे आरोपी शोधण्याचे आवाहन होते.पोलिसाने कसुन तपास करत बारा तासाच्या आत सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यानेच हल्ला  केल्याचे समोर आले आहे.